Jaykumar Gore : मुख्यमंत्र्यांची सभा ठरेल टर्निंग पॉईंट

पालकमंत्र्यांना विश्वास; भगवा पडदा, 50 फुटांचे स्टेज
Devendra Fadnavis
सोलापूर ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेसाठी उभारण्यात आलेला शामियना.
Published on
Updated on

सोलापूर ः आज, शनिवार (दि. 10) होणारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा या निवडणुकीतील टर्निंग पॉईंट असेल असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. ना. गोरे यांनी सभा स्थळाची पाहणी करून आढावा घेतला.

Devendra Fadnavis
Jaykumar Gore | विमानसेवा, आयटी पार्कचा प्रश्न भाजपने मार्गी लावला : पालकमंत्री जयकुमार गोरे

यंदाच्या महापालिका निवडणुकीतही भारतीय जनता पार्टीने शतप्रतिशत भाजपसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सर्व 26 प्रभागातून 102 उमेदवार दिले आहेत. या भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज, शनिवारी दुपारी साडेबारा वाजता हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी सुरु आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे हे स्वतः या सभेच्या तयारीवर लक्ष ठेवून आहेत. शुक्रवारी दुपारी या सभेच्या ठिकाणची पाहणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली, यावेळी आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, बिज्जू प्रधाने, विजय कुलथे यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, सोलापूरकरांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापूरकरांसाठी मोठया प्रमाणात योजना आणल्या असून, शहराचा पाणी पुरवठा पाईपलाईन, विमानसेवा, आयटी पार्क अशा अनेक योजना कार्यान्वित होत आहेत. देवभाऊ याबरोबर अनेक विकास कामांच्या योजना सोलापूरला देणार आहेत. त्यांची ही सभा या निवडणुकीतील टर्निंग पॉईंट असल्याचे ना. गोरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यावेळी काय बोलणार याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे. या सभेस भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे .

Devendra Fadnavis
Solapur Municipal Election 2026 : सोलापूरमध्ये प्रभागनिहाय लढती, भाजपचे किती उमेदवार रिंगणात? यादी एका क्लिकवर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news