

बार्शी : पर जिल्ह्यातील महिलेला आपल्या लॉजवर बोलावून घेऊन तिला डांबून तिच्याकडून देह व्यापार करून घेतल्याप्रकरणी बार्शी तालुक्यातील जामगाव (आ) येथील स्वराज लॉजच्या मालकासह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 26 वर्षीय पीडीतेची तेथून सुटका करण्यात आली. अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष, सोलापूर ग्रामीण च्या पथकाने ही कारवाई केली.
महेश प्रल्हाद आवटे (वय 30, रा. जामगाव (आ) ता. बार्शी व लॉजचा मॅनेजर नागेश राजू हंचाटे (वय 56, रा. माधव नगर, सोलापुर) अशी या प्रकरणात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.दोघांना बार्शी न्यायालयात उभे केले असता सोमवार पर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे यांनी याबाबत तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पो.नि. चंद्रकांत सुर्यवंशी यांना जामगावमधील स्वराज लॉज या ठिकाणी लॉजचा मालक महिलांना डांबुन ठेवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बनावट गिर्हाईक तयार करून लॉजवर छापा टाकून कारवाई करण्यात आली.