Ram Satpute murder conspiracy: राम सातपुते हत्येच्या कटाची चौकशी सुरू

पालकमंत्री गोरे यांची माहिती
Ram Satpute murder conspiracy
Ram Satpute murder conspiracyFile Photo
Published on
Updated on

सोलापूर : माळशिरस तालुक्याचे माजी आ. राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता, असा आरोप पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला होता. त्याची चौकशी सुरू आहे. पोलिस चौकशीतून ती नावे समोर येतील, अशी माहितीही पालकमंत्री गोरे यांनी दिली.

दरम्यान, माझ्या हत्येचा कट रचण्यात खा.धैर्यशील मोहिते-पाटील आणि अर्जुनसिंह मोहिते-पाटील हे मास्टरमाईंड असतील, असा आरोपही राम सातपुते यांनी केला आहे. माझ्या हत्येच्या कटासंदर्भात पोलिसांना अगोदरच माहिती मिळाली. त्यानुसार गेल्या 3 दिवसांपासून पोलिस माळशिरस तालुक्यात तळ ठोकून आहेत. काही व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे.

कॉन्ट्रॅक्ट किलिंग करण्याचा प्रकार होता. याबाबत आपल्या हत्येत कोण कोण असू शकते, या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री गोरे यांना चिठ्ठी दिली असल्याचेही राम सातपुते यांनी सांगितले आहे.

मुर्दाड माणसाला कोण मारणार

माजी आ. राम सातपुतेसारख्या मुर्दाड माणसाला कोण मारणार, कशासाठी मारायचं, असा मुद्दा उपस्थितीत करत याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनाच माहीत, असे आ. उत्तम जानकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news