

सोलापूर : शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता परीक्षेमधून 2022 नंतर जवळपास वीस हजार शिक्षकांचे पदे भरण्यात आली आहेत. मात्र, या भरती प्रक्रियेमधील अपात्र, गैरहजर, माजी सैनिक रिक्त जागा, अशा अनेक पदे रिक्तच ठेवली होती. त्या जागा तातडीने भरावीत, अशी नोटिस उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाला दिली आहे. त्यामुळे या रिक्त जागांची भरती प्रक्रिया होण्याची शक्यता आहे.
टीएआयटी म्हणजेच शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता परीक्षेतून शिक्षकांना घेण्यात आले. मात्र, त्या प्रक्रियेतून अपात्र, रिक्त, गैरहजर, 10 टक्के आरक्षित जागा आणि माजी सैनिकांच्या आरक्षित जागा भराव्यात, यासाठी शिक्षकांनी कोल्हापूर येथील उच्च न्यायालय याचिका दाखल केली होती. त्यामुळे उच्च न्यायालयाने रिक्त जागा तातडीने भरावे, असे आदेश दिले आहे.
शासनाने जे उमेदवार निवडले आहेत. त्याची यादी प्रसिद्ध करावी. शालार्थ आयडी कोर्टात सादर करावेत. शिक्षक भरती टप्पा एक मध्ये गैरहजर, अपात्रांची संख्या भरपूर असताना जे उमेदवार टप्पा -एक मध्ये लागलेले आहेत, त्यांचीच निवड कन्व्हर्ट राऊंडला निवड झाली आहे. एका उमेदवारांची निवड तीन-तीन ठिकाणी होत झाल्याचे दिसत आहे. उमेदवार एका जागेवरच हजर असेल म्हणजे दोन जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.