

सोलापूर : भारतीय टपाल सेवा ही जगातील प्रत्येक देशातील विविध शहराला उत्तम नेटवर्कद्वारे जोडली गेली आहे. जागतिक पातळीवर भारतीय टपाल सेवा दर्जेदार व देशासह जगातही संपर्काचे मोठे जाळे आहे. हे याचे वैशिष्ट्ये आहे. भारतातील राष्ट्रीय टपाल दिन हा दरवर्षी 10 ऑक्टोबर रोजी साजरा होतो.
1820 च्या दशकात थॉमस वॅगॉर्न यांनी भारतातील टपाल मार्ग सुधारण्यासाठी कार्य सुरू केले. नंतर 1874 साली स्वित्झर्लंडमधील बर्न येथे जगातील 22 देशांनी जागतिक टपाल सेवेसाठी करार केला. यातून युनिव्हर्सल पोस्टल युनियनची स्थापना झाली. आंतरराष्ट्रीय टपाल सेवा सुलभ करणे, लोकांना टपाल क्षेत्राच्या भूमिकेबद्दल जागरूक करणे व देशांच्या सामाजिक, आर्थिक विकासातील त्याचे योगदान अधोरेखित करावे लागते.
जगात ज्या सेवेची माध्यम आहेत, त्या सर्व सेवेच्या माध्यमात टपाल सेवा खूप महत्त्वाची मानली जाते. भारतात मुंबई येथूनच पहिली फॉरेन टपाल सेवा कार्यालय सुरू झाले. जागतिक पत्रव्यवहारासह पार्सल पाठवतांना पत्राच्या वजनावरून त्याचे दर आकारण्याची पद्धती आहे. आजच्या घडीला अमेरिका आणि कॅनडा वगळता जगातील प्रत्येक देशातील लहान गावापासून ते ज्या त्या देशाच्या राजधानीपर्यंत पत्रव्यवहारासह पार्सल पाठवता येते. तशी सोय आंतरराष्ट्रीय स्तरावरून पोस्टाद्वारे करण्यात आली आहे. बदलत्या काळानुसार आंतरराष्ट्रीय पोस्टाच्या सेवेत गतिमानता आणली आहे. याकरिता स्पीड पोस्ट ही नवी सेवा सुरू केली आहे. यामुळे कमीत कमी कालावधीत आंतरराष्ट्रीय स्तरावरही ही सेवा उपलब्ध आहे.
देश स्पीड पोस्ट दर दहा किलोपर्यंत
नेपाळ 2 हजार 632
रशिया 6 हजार 750
ऑस्ट्रेलिया 11 हजार 913
जपान 4 हजार 797
जर्मनी 5 हजार 876