Vitthal Rukmini Temple: स्वातंत्र्यदिनी विठ्ठल-रुक्मिणी मातेस अलंकार परिधान

तिरंगी रंगाचे उपरणे : भाविकांची मोठी गर्दी
Vitthal Rukmini Temple: स्वातंत्र्यदिनी विठ्ठल-रुक्मिणी मातेस अलंकार परिधान
Published on
Updated on

पंढरपूर : स्वातंत्र्यदिनानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले. यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे रूप अधिक खुलून दिसत होते. दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट, कौस्तुभमणी, हिऱ्याचा कंगनजोड, नामनिळा, दंडपेट्या जोड, मोठा मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी, इमिटेशन नेकलेस, मारवाडी मोत्याचा हार, लहान व मोठा शिरपेच, तुळशीची माळ, लक्ष्मी पदकासह लॉकेट, तोडे जोड, मत्स्य जोड आदी अलंकार परिधान करण्यात आले होते.

श्री रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा आदी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आलेले होते.

दरम्यान, स्वातंत्रदिनानिमित्त श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात विविध प्रकारच्या दोन टन फुलांचा वापर करून आकर्षक सजावट करण्यात आली. यात गुलाब, ऑर्केट, शेवंती, झेंडू, जिप्सो, जरबेरा, ब्लूडीजी आदी फुलांचा समावेश आहे. तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला तिरंगी रंगाचे उपरणे परिधान करण्यात आल्याने देवाचे रूप अधिकच खुलून दिसत होते. मंदिर व भक्त निवास येथे तिरंगा रंगाची विद्युत रोषणाई केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news