

सोलापूर : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून चालविण्यात येत असलेल्या मागासवर्गीय शासकीय विद्यार्थी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यासह आणि वसतिगृहात राहत असलेल्या मुलींना स्वच्छता प्रसाधनासाठीच्या भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे.
या वाढीव निर्वाह भत्त्याचा मुलांना तर मुलीसाठी स्वच्छता प्रसाधनाच्या भत्त्यामुळे सामाजिक न्याय विभागातील वसतिगृहात मुक्कामाला राहणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना होणार आहे. याचा संबंधित विद्यार्थ्यांना लाभ होणार असल्याचे दिसून येते.
विद्यार्थिनींसाठीही वाढीव भत्ता
विद्यार्थिनींसाठी मिळाणारी स्वच्छता प्रसाधन भत्त्यात वाढ करण्यात आले आहे. मुलींच्या प्रसाधनासाठी 100 रुपयांवरून 150 रुपये केला आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यापासून वाढीव भत्ता लागू करण्यात आला आहे.
राज्यात 651 वसतिगृहे, क्षमता 43 हजार 858
राज्यात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने शासकीय वसतिगृह चालवली जाते. त्यात मुलांचे 230 वसतिगृहात 23 हजार 208 तर मुलींच्या 213 वसतिगृहात 20 हजार 650 मुली मुक्कामाला राहून शिक्षण घेत आहेत. 651 वसतिगृहातील विद्यार्थी क्षमता ही 43 हजार 858 विद्यार्थ्यांची आहे. 651 शासकीय वसतिगृहात एकूण 43 हजार 858 विद्यार्थ्यांचे राहण्यासह जेवणाची व्यवस्था करण्यात येते. या विद्यार्थ्यांना आता निर्वाह भत्ता व स्वच्छता प्रसाधनाच्या भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. वाढीव, भत्त्यामुळे अनुसूचित जाती मधील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.