Solapur News
मंगळवेढा : पोलीसांना निवेदन देताना प्रा. लक्ष्मण ढोबळे व कार्यकर्तेPudhari Photo

मंगळवेढ्यात अवैधरीत्या दारू धंदे सुरू

भाजप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण ढोबळे यांचा सरकारला घरचा अहेर
Published on

मंगळवेढा : पुढारी वृत्तसेवा

मंगळवेढा शहरातील साठेनगरसह अन्य भागात अवैध दारूधंदे बोकाळले असून दारूमुळे तरुण मुले व्यसनाधीन होऊन मृत्युमुखी पडत आहेत. दरम्यान, या दारूमुळे तरुण वयातील मुली विधवा बनून त्यांना आयुष्यभर संकटांना मुला बाळासह सामोरे जावे लागत असल्याची तक्रार माजी मंत्री तथा भाजपचे प्रदेश प्रवक्ते प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी एका लेखी निवेदनाद्वारे पोलिस प्रशासनाकडे करून शहरासह ग्रामीण भागात अवैध धंद्याने मांडलेला उच्छाद तत्काळ थांबवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Solapur News
अवैध धंदे सुरू नसणारी बारा गावे दाखवा.. अन् लाख रुपये बक्षीस मिळवा

मंगळवेढा शहरातील साठेनगर भागात जवळपास सहा अवैध धंदे तर शहराच्या अन्य भागांतही बिनबोभाट दारू धंदे सुरू आहेत. त्याचबरोबर तालुक्याच्या ग्रामीण भागातही अशीच परिस्थिती असून दारूमुळे तरुण मुले व्यसनाच्या आहारी जाऊन मृत पावत आहेत. शहरामध्ये आतापर्यंत जवळपास 10 तरुण मृत पावल्याचे चक्क नावासह यादीच पोलीस प्रशासनास माजी मंत्री ढोबळे यांनी सादर केली आहे. पोलीसांच्या हप्तेखोरीमुळे तरुण मुलांची जीव जावून गोरगरीबांचा संसार रस्त्यावर येत असल्याचे विदारक चित्र आहे. एका माजी मंत्र्याला दारुसाठी चक्क पोलीस स्टेशनला दारु बंद करा म्हणण्याची वेळ आल्याने सुज्ञ नागरीकांनी कपाळा हात लावले आहेत.

माजी मंत्री प्रा.ढोबळे हे रविवार दि.6 रोजी दुपारी 2 वाजता आपल्या कार्यकर्त्यांचा फौजफाटा घेऊन पोलिस स्टेशनला हजर होताच उपस्थित नागरिकांच्या नजरा त्यांच्याकडे खेचून घेतल्या. पती मेल्यानंतर विधवा स्त्रीला आयुष्यभर विना आधाराचे रखडत लहान मुलांना घेऊन जीवन जगावे लागते. मंगळवेढा येथे डी.वाय.एस.पी.दर्जाचे अधिकारी असतानाही त्यांनी आतापर्यंत अवैध धंद्यावर छापे टाकण्यासाठी एकही कार्यालयाकडील पथक नेमले नसल्याचा आरोप आहे. तत्कालीन महिला डी. वाय. एस. पी. राजश्री पाटील त्यांच्या कार्यालयाचे स्वतंत्र पथक नेमून मंगळवेढा व सांगोला दोन्ही तालुक्यांत धाडी टाकून अवैध धंद्यावर अंकुश ठेवला होता. एवढी कारवाई करुनही अवैध धंद्याचा प्रश्न त्यावेळी अधिवेशनात गाजला होता.

सातारा : ‘सगळेच समाज अस्वस्थ झाले असताना हे सरकार फक्त लुटायचे धंदे करत आहे’

रात्री 11 च्या पुढेही अवैध दारूविक्री करणारे ढाबे सुरू असल्याचे चित्र आहे. इतर व्यावसायिक आपली दुकाने लवकर बंद करुन निघून जातात. मात्र दारूवाले अधिक धंदा होईल या मोहापायी रात्री उशिरापर्यंत व्यवसाय सुरु ठेवून आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. मात्र या नादात तरुण युवकांचे आयुष्य बरबाद होत असल्याचा विचार कोणीही करीत नसल्याच्या प्रतिक्रीया सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत. दरम्यान पोलिस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे यांना माजी मंत्री प्रा. ढोबळे यांनी दारू व्यवसाय बंद करण्याचे निवेदन दिल्याने पोलिस प्रशासन आता तरी दारू व्यवसाय बंद करणार याकडे तमाम नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news