Solapur Crime : तो दवाखाना अखेर सील, महापालिका आरोग्य पथकाची कारवाई

एक हॉस्पिटल सील झाल्यानंतरही चोरून चालवत होते दुसरे हॉस्पिटल
Solapur Crime |
सोलापूर : बाळ्यातील चोरून सुुरू केलेला दवाखाना सील करताना महापालिकेचे आरोग्य विभागाचे पथक.Pudhari Photo
Published on
Updated on

सोलापूर : महापालिकेने नवी पेठेतील श्रेयश नर्सिंग होम सील केले होते. मात्र तरीही हे श्रेयश हॉस्पिटल दुसरीकडे गुपचूप सुरू केले होते. याची माहिती मिळाल्यानंतर महापालिका आरोग्य विभागाच्या पथकाने कारवाई करीत दुसरे हॉस्पिटलही सील केले.

हॉस्पिटलमधील रुग्ण स्वतःच्या खासगी रूग्णालयात घेऊन कट प्रॅक्टीस करणारे डॉ. सुमित आणि डॉ. श्रद्धा सुरवसे हे दाम्पत्य एक हॉस्पिटल सील झाल्यानंतरही दुसरे बाळे येथे चोरून हॉस्पिटल चालवत होते. आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी बुधवारी हा प्रकार उजेडात आणला. गुरूवारी सायंकाळी कायदेशिर प्रक्रिया पूर्ण करून हा दवाखाना अखेर सील केला.

मुंबई नर्सिंग अ‍ॅक्टचा भंग केल्या प्रकरणी 1 ऑगस्ट रोजी नवी पेठेतील श्रेयश हॉस्पिल सील केले होते. त्याशिवाय त्या ठिकाणी ऑपरेशन थिएटर, डिलिव्हरी रूम, सोनोग्राफी मशिन देखिल आढळुन आली होती. गुरूवारी आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, डॉ.प्रसाद कुमार, राजू शिवशिंपी,सागर चव्हाण, विजय व्हटकर यांच्या पथकांनी हे हॉस्पिटल सील केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news