सांगोल्याजवळ पिकअपच्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू

मुलगा गंभीर जखमी; शिरभावी रस्त्यावरील घटना
Solapur Accident News |
मृत धंनजय क्षीरसागर, सुवर्णा क्षीरसागर File Photo
Published on
Updated on

सांगोला : सांगोला-शिरभावी रस्त्यावर इंगळे पाटी पेट्रोल पंपाजवळ झालेल्या मोटारसायकल व पिकअपच्या भीषण अपघातात धंनजय क्षीरसागर (वय 50), सुवर्णा क्षीरसागर (वय 44) या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा ब्रह्म (वय 14) गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना मंगळवारी (दि. 25) सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान घडली. या दुर्घटनेमुळे शिरभावी गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते.

याबाबत मिळालेली माहिती अशी , शिरभावी (ता. सांगोला) येथील बँक ऑफ महाराष्ट्र येथे नोकरीस असलेले धनंजय क्षीरसागर हे पत्नी सुवर्णा क्षीरसागर व मुलगा ब्रह्म यांच्या समवेत दुचाकीवरून शिरभावीकडे निघाले असता भरधाव वेगाने आलेल्या पिकअपने त्यांना जोराची धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातानंतर मोटरसायकलवरील तिघेही उडून आजूबाजूला फेकले गेल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून समजले. अपघातात क्षीरसागर दांम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. मुलगा गंभीर जखमी झाला. मुलाला सांगोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी सांगलीला पाठवण्यात आले. मयत धनंजय हे बँक ऑफ महाराष्ट्रच्या शिरभावी शाखेत अनेक वर्षांपासून नोकरीस होते. त्यांच्या पत्नी सुवर्णा या शिरभावी येथे टेलरिंगचा व्यवसाय करत होत्या. या दाम्पत्यास तीन मुली व एक मुलगा आहे. त्यापैकी दोघी मुली बाहेर शिक्षण घेतात. क्षीरसागर दाम्पत्याच्या मृत्यूमुळे शिरभावी गावावर शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news