

केम : करमाळा तालुक्यातील केम येथील ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर देवस्थानचे हेमाडपंती मंदिर आहे. या देवस्थानला फार मोठा इतिहास आहे. या मंदिराशेजारी पुरातन क्षेमकुंड (बाराव) आहे. या बारवध्ये शेकडो मासे मृत्युमुखी पडले असून, हे मासे कसे मृत्यु पडले याची चौकशी करण्याची मागणी शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षा चव्हाण यांनी केली आहे.
दर सोमवारी उत्तरेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी असते. या पाण्यातील माशाना भाविक खायला टाकतात. या बारववर देवस्थानला जमिन दिलेल्या खंडकरी शेतकर्यांचे पाण्यास हिस्से आहेत, उन्हाळा असल्याने पाणी कमी झाले आहे, त्यामध्ये शेतकरी पिकाना पाणी देण्यासाठी पाण्याचा उपसा करत असल्याने पाणी खुप कमी झाले आहे. त्यामुळे हे मासे मेले असल्याची नागरिकांचे म्हणणे आहे.