HPV vaccination: वीस दिवसांत 900 मुलींना एचपीव्ही लस

14 वर्षांवरील 27 हजार मुलींना लस देण्याचे उद्दिष्ट
HPV Vaccine
HPV VaccinePudhari
Published on
Updated on

सोलापूर : गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचा प्रतिबंध करण्यासाठी 14 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींना आरोग्य विभागातर्फे एचपीव्ही लस दिली जात आहे. ही मोहीम सुरू होऊन जवळपास 20 दिवस झाले असून आतापर्यंत फक्त 900 मुलींना लस देण्यात आली. जिल्ह्यातील 26 हजार 700 हजार मुलींना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. ही मोहीम येत्या जूनपर्यंत सुरू राहणार आहे.

एचपीव्ही लसीकरणाला पालकांचा अपेक्षित प्रतिसाद नाही. महिलांमध्ये आढळणाऱ्या गंभीर आजारांपैकी व तसेच गर्भाशय मुखाचा कर्करोग हा एक प्रमुख आजार मानला जातो. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एचपीव्ही ही लस प्रभावी ठरणार आहे. सर्व शासकीय आरोग्य केंद्रातून लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील लस घेणाऱ्या मुलींचे प्रमाण अधिक आहे. लस दिल्यानंतर मुलींना ताप येतो. पुढे काय धोका होईल का? अशी भीती बाळगत पालक संमतीपत्र देण्यास टाळताना दिसत आहेत. ही लस सुरक्षित असून ती जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणित केली आहे.

14 वर्ष वयोगटातील मुलींना गर्भाशय मुखाचा कर्करोगाचा धोका भविष्यात निर्माण होऊ नये यासाठी ही लस घेणे आवश्यक आहे. सध्या वार्षिक परीक्षांचा काळ असल्याने प्रतिसाद कमी आहे. परीक्षा संपल्यानंतर ग्रामीण भागात आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी आणि अधिकारी घरोघरी जाऊन याविषयी पालकांचे समुपदेशन करून लसीसाठी संमतीपत्र घेतली जाणार आहे.
डॉ. मोहन शेगार, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news