सोलापूर : मराठी महिन्यातील चैत्र महिन्यापासून हिंदू नववर्षास प्रारंभ होतो. गुढीपाडव्याच्या दिवसापासून नववर्ष सुरू होते. यंदा मार्च महिन्यात शिमगा अर्थात होळी, धुलिवंदन आणि गुढीपाडवा असे महत्त्वाचे हिंदू सण आहेत. 30 मार्च रोजी गुढीपाडवा सण आहे.
मार्च महिन्यातील सण
1 मार्च रामकृष्ण परमहंस जयंती, 2 मार्च रमजान रोजे प्रारंभ, 3 मार्च श्री गजानन महाराज प्रकट दिन, 8 मार्च जागतिक महिला दिन, 10 मार्च सावित्रीबाई फुले पुण्य दिन, 15 मार्च जागतिक ग्राहक दिन, 16 मार्च संत तुकाराम महाराज बीज, 17 मार्च छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथीप्रमाणे, 29 मार्च दर्श अमावस्या, 31 मार्च स्वामी समर्थ प्रकट दिन.
13 मार्च होळी
यंदा गुरुवारी 13 मार्च रोजी होळी सण आहे. हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे, तो हिरण्यकश्यपुवर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे स्मरण केली जाते. होळी भारतात वसंत ऋतूचे आगमन, हिवाळ्याचा शेवट आणि प्रेमाचा बहर साजरा करणारा सण आहे. होळीला महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची पध्दत आहे.
14 मार्च धुलिवंदन
होळीच्या दुसर्या दिवशी धुलिवंदन साजरी करण्याची पध्दत आहे. धुलिवंदन हा होळीची राख व माती अंगाला लावण्याचा दिवस असून हा सण होळीच्या दुसर्या दिवशी साजरा करतात. यास धुळवड असेही म्हणले जाते. उत्तरभारतात धुलिवंदन मोठ्याप्रमाणात साजरी केली जातात.
19 मार्च रंगपंचमी
होळी झाल्यानंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी सारजी केली जाते. रंगपंचमीच्या दिवशी महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणात रंग खेळली जाते. चौका चौकात गु्रपने डिजे लावून रंग खेळली जाते. यंदा बुधवारी 19 मार्च रोजी रंगपंचमी आहे.
30 मार्च रोजी गुढीपाडवा
गुढी पाडवा हा महाराष्ट्रात नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून ओळखला जातो. हा सण मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि महाराष्ट्रात कापणीचा हंगाम आहे. गुढी या शब्दाचा अर्थ हिंदू ब्रह्मदेवाचा ध्वज किंवा प्रतीक आहे आणि पाडवा म्हणजे चंद्राच्या टप्प्याचा पहिला दिवस. गुढीपाडव्यादिवशी घराच्या दारासमोर उंच गुढी उभारण्याची प्रथा आहे. शेतातील कामांची सुरुवातही याचदिवशी पूजन करुन केली जाते. गुढीपाडव्याला ग्रामीण भागात कडुलिंबाची फुले, पाण्यात भिजवलेले हरभरा डाळ, थोडासा गुळ किंवा साखर मिसळून खाण्याची प्रथा आहे.

