वाळूज, देगाव परिसरात ३ तास मुसळधार

जाधववाडीचा संपर्क तुटला, मोहोळ-वैराग रस्त्यावरील पुल पाण्याखाली
Heavy Rain
मोहोळ तालुक्यातील वाळूज व देगाव परिसरात मुसळधार पाऊस file photo
रमेश दास

मोहोळ : मोहोळ तालुक्यातील वाळूज, देगाव परिसरात पुनर्वसू नक्षत्रातील पहिल्याच मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून सुमारे ३ तास मुसळधार पाऊस कोसळत होता. भोगावती व नागझरी नद्यांना महापूर आल्याने वाळूचा जाधववस्तीशी असलेला संपर्क तुटला आहे. या पावसाने सोयाबीनसह खरिपाची पिके पाण्यात गेली असून ओढे, नद्यांना पूर आला आहे. मोहोळ-वैराग रस्त्यावरील मुंगशी येथील पूल पाण्याखाली गेल्याने रात्री उशिरापर्यंत वाहतूक ठप्प होती.

Heavy Rain
Rain Update : मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्राला चार दिवस अतिवृष्टीचा इशारा

मोहोळ तालुक्यातील नरखेड, वाळूज व देगाव परिसरात सोमवारी सायंकाळी चार वाजल्यापासून रात्री साडेसात वाजेपर्यंत ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने झोडपून काढले. ढगफुटी सदृश्य तीन तास पडलेल्या मुसळधार पावसाने वाळूज (दे), देगाव (वा), मनगोळी, भैरववाडी, नरखेड, मुंगशी (वा), दहिटणे, बुद्रुकवाडी, भागाईवाडी, साखरेवाडी परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. या पावसाने ओढे नद्यांना महापूर आला आहे. मोहोळ-वैराग रस्त्यावरील ठिकठिकाणच्या ओढ्यावरील छोटे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. खरिपाची पिके पाण्यात बुडाली असून सखल भागातील पाण्याचा निचरा झाला नाही, तर दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहणार आहे. पावसामुळे ओढ्यांना नदीचे, शेतांना तळ्याचे रूप धारण केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news