

सोलापूर : भवानी पेठ येथील मुकुंदनगर बुद्ध विहार येथे माहेरून पैसे घेऊन ये म्हणत शिवीगाळ करून मारहाण करीत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या तिघांविरुद्ध जोडभावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
यात पूजा शशिकांत गोरसे (वय 26, रा.मड्डी वस्ती, जुना तुळजापूर नाका) यांनी पती शशिकांत गोरसे, सासू माया गोरसे, नणंद संगीता गोरसे व सुजाता यादव (सर्व रा. मुकुंद नगर, बुद्ध विहाराच्या पाठीमागे, भवानी पेठ) यांच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. संशयित आरोपी क्रमांक एक याने फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेऊन, दारू पिऊन मारून पैसे घेऊन ये म्हणत मारहाण केली. तसेच संशयित आरोपी क्रमांक दोन व एक यांनी फिर्यादीबद्दल हिला सोडून दे, मी तुझे दुसरे लग्न लावून देते असे म्हणून फिर्यादीला वारंवार शिवीगाळ करीत असे. तसेच संशयित आरोपी क्रमांक तीन व चार या फिर्यादीबद्दल फिर्यादीच्या पतीला हिला नांदू नको, आम्ही तुझे दुसरे लग्न लावून देतो असे म्हणून शिवीगाळ करत मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. ही घटना आठ मे 2016 ते 30 जुलै 2023 पर्यंत सासरी घडली.