घरफोडी करणार्‍या सराईत चोरट्याला ठाण्यातून अटक

Solapur Crime News | 1 लाख 93 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त
Solapur Crime News |
घरफोडी करणार्‍या सराईत चोरट्याला ठाण्यातून अटक File Photo
Published on
Updated on

सोलापूर : शहरातील विविध भागांमध्ये घरफोडी करणार्‍या सॅमसन रूबेन डॅनियल (वय 26, रा. कल्याण वेस्ट, ठाणे) या आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारास ठाण्यातून अटक करून त्याच्याकडून घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आणले. त्याच्याकडून एक लाख 93 हजार 350 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात शहर गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्याच्याकडून दोन घरफोडी गुन्ह्यातील एकूण 48.13 ग्रॅम सोने, 34 ग्रॅम चांदी, दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण एक लाख 93 हजार 350 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपी हा दिवसा घरपोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध सोलापूर शहर तसेच महाराष्ट्रातील ठाणे, रत्नागिरी, सांगली, जळगाव तसेच गुजरात व मध्य प्रदेश राज्यातही दिवसात घरफोडी चोरीचे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. ही कामगिरी गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या पथकाने केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news