Dr. Jyoti Waghmare: डॉ. ज्योती वाघमारे यांचे आज सोलापुरात रॅलीने होणार स्वागत

शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे या शनिवारी (दि. 7) सोलापुरात येणार आहेत
Dr. Jyoti Waghmare
Dr. Jyoti WaghmarePudhari
Published on
Updated on

सोलापूर : शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे या शनिवारी (दि. 7) सोलापुरात येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी दुपारी चार वाजता छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथून रॅली काढण्यात येणार आहे. शिवसेनेकडून (शिंदे गट) त्यांची राज्यसभेवर नियुक्ती निश्चित झाली असून आता घोषणेची औपचारिकता बाकी आहे.

सोलापुरात मोची समाजात जन्मलेल्या ज्योती वाघमारे यांनी अतिशय हालाखिच्या परिस्थितीतून एवढी मोठी झेप घेतली. शिवसनेच्या प्रवक्त्या म्हणून त्यांनी गेल्या तीन वर्षात पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली. त्याचे फळ त्यांना मिळाले.

राज्यसभेसाठी भल्या भल्या दिग्गजांना डावलून ज्योती वाघमारे यांना राज्यसभा मिळाली असून बिनविरोध निवडीची औपचारीकता बाकी आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रथमच सोलापुरात येणाऱ्या ज्योती वाघमार त्यांच्या स्वागताची शिवसेना आणि मोची समाजाने तयारी केली आहे. सर्व महापुरुषांना अभिवादन करत ही रॅली वाघमारे यांच्या घरापर्यंत निघणार आहे. या रॅलीत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन मोची समाजाच्या वतीने करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news