Solapur News: ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडून असहकार आंदोलन

जिल्ह्यातील विविध गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन
Solapur News: ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडून असहकार आंदोलन
File Photo
Published on
Updated on

बार्शी : प्रशासनाच्या जाचाला कंटाळून ग्रामपंचायत अधिकाऱ्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रशासनातील वरिष्ट अधिकाऱ्याची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी आज सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ग्राम पंचायत अधिकाऱ्यांनी संबंधित पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले. जिल्ह्यात प्रशासनाबरोबर असहकार आंदोलन सुरू केले आहे.

पंचायत समिती माढा येथे सध्या कार्यरत ग्रामपंचायत अधिकारी तथा बार्शी येथील रहिवाशी प्रकाश बाविस्कर यांनी दि. 19 नोव्हेंबर रोजी वरीष्ठ प्रशासनाच्या जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.सध्या ते बार्शी येथील हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत.या घटनेचा निषेध म्हणुन सोलापूर जिल्हा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्यावतीने पंचायत समिती बार्शी येथे गुरुवारी एक दिवसीय धरणे आंदोलन केले होते.तसेच सदर प्रकरणाची चौकशी होऊन दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

आज ठिकठिकाणच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन असहकार आंदोलन सुरु केले आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यामूळे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना अनेक अडचणींना सामोर जावे लागत आहेत. त्यामूळे कमालीच्या मानसिक दडपणाखाली काम करावे लागत आहे. अनेक कामे सांगून ते तत्परतेने करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी दबाव आणत असल्याचे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे म्हणणे आहे. शनिवारपासून सुरु होणार असहकार आंदोलनाचा विविध कामांवर परिणाम होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news