

सोलापूर : जिल्ह्यातील 666 ग्रामपंचायतींवर प्रशासक आहे. सरंपच, ग्रामसेवकांना निधी खर्च करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी ठप्प झाला असून सरपंच, ग्रामसेवकांची कोंडी झाली आहे.
जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी जिल्हा परिषद, पंचायत समितीने ग्रामपंचायतींना मार्च अखेरीस निधी वर्ग केला आहे. मात्र, ज्या ग्रामपंचायतीवर प्रशासक आहे, अशा ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक यांना निधी खर्च करण्याचा अधिकार शासनाने दिला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये निधी येऊनही ठेकेदाराला वर्ग करण्यात आला नाही.
त्यामुळे शाळा, अंगणवाडी, रस्त्यांसह इतर कामे करुनही ठेकेदार निधीपासून वंचित असून, गटविकास अधिकाऱ्यांना निधी खर्च करण्याचे अधिकार द्यावेत, अशी मागणी होत आहे. जिल्ह्यातील 666 ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने त्यावर सरपंचांना प्रशासक नेमले आहे. परंतु त्यांना निधी खर्च करण्याचा अधिकार देण्यात आला नाही. त्यामुळे निधी खर्च करण्यास सरपंच यांना अडचण येत असून, विकासकामांचा निधी ठप्प झाला आहे.