Solapur Gram Panchayat Election : राजन पाटील गटाचे सरपंचासह ३ उमेदवार बिनविरोध
सोलापूर: पुढारी वृत्तसेवा : सोलापूर जिल्ह्यात एकूण १८९ पैकी १७४ ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पार पडत आहेत. तर यातील १५ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. यासाठी जिल्ह्यात ११ केंद्रावर मतमोजणीस सकाळपासून सुरुवात झाली आहे. तर सरपंच पदासाठी ४९८ तर सदस्य पदासाठी ३ हजार ४२१ उमेदवार रिंगणात आहेत. याच दरम्यान सोलापुरातील ग्रामपंचायत निवडणूक निकालातील अपडेट जाणून घेऊयात…
Solapur Gram Panchayat Election
सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीने खाते उघडले असून पंढरपूर तालुक्यातील अजोती ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी आरती अभिजीत पाटील विजयी उमेदवार झाल्या आहेत.
कामती बुद्रुक ग्रामपंचायत : प्रविण भोसले राष्ट्रवादीची सरसी
मोहोळ तालुक्यातील मोरवंची, अरबळी, सारोळे, डिकसळ, कामती खु॥ व ढेकळेवाडी ग्रामपंचायतवर राजन पाटील गटाचे वर्चस्व
अर्धनारी ग्रामपंचायतवर राजन पाटील गटाचे सरपंचांसह ३ उमेदवार बिनविरोध
गावडी-दारफळ (सरपंच निवडणूक)
माळी भारत बाबू 1175
माळी तुकाराम गोवर्धन 1019
विजयी-माळी भारत बाबू
उत्तर सोलापूर
रानमसले ग्रामपंचायत सरपंच निवडणूक
मनोज तानाजी क्षीरसागर(दिलीप माने गट)993
आकाश कैलास गजगाटे(भाजप) 484
कृष्णात सावंत-450
विजयी-मनोज तानाजी क्षीरसागर (दिलीप माने गट)
उत्तर सोलापूर कौठाळे ग्रामपंचायत सरपंच निवडणूक
पाटील श्वेता धनंजय 1216
माने अंजना अनिल 996
माळी अनिता महादेव 181
विजयी-पाटील श्वेता धनंजय(सर्वसाधारण महिला)
उत्तर सोलापूर पाकणी ग्रामपंचायत सरपंच निवडणूक
यलगुंडे बालाजी सिद्राम 848
ढेपे बापूसाहेब बाळकृष्ण 465
खांडेकर तात्या गणपत 435
विजयी-यलगुंडे बालाजी सिद्राम
उ. सोलापूर अकोलेकाटी ग्रामपंचायत सरपंच निवडणूक
अंजली क्षीरसागर 727
दीपमाला क्षीरसागर 556
गवळी शीतल प्रदीप 358
विजयी-अंजली क्षीरसागर
हेही वाचलंत का?

