

दक्षिण सोलापूर : सर्व शेतकरी बांधवांच्या पाठीशी सरकारने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी बांधवांना माझं सांगणं आहे की, तुम्ही बिनधास्त राहा. सरकार हे शेतकऱ्यांचं, सामान्य माणसांच आहे, असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला.
हत्तूर येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजनाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार सुभाष देशमुख, भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, पालकमंत्र्यांच्या पत्नी सोनियाताई गोरे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस अमोलबापू कारंडे, हत्तूर मठाचे शिलिसिद्ध महाराज, सरपंच ज्योती कुलकर्णी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉ. चनगोंडा हवीनावळे, सोलापूर सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामाप्पा चिवडशेट्टी आदी उपस्थित होते.
जेव्हा कोणालाच काही संधी मिळत नाही, कुणालाच काही करता येत नाही, काहीच सांगता येत नाही, अशी माणसं आता बांधावर जात आहेत. अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे का नाही पोहोचले याचा हिशोब मागत आहेत. आम्हाला आनंद याचा आहे किमान निवडणूक आली म्हणून तरी हे लोक शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्यानंतर देखील शेतकरी त्यांच्याजवळ गेला नाही. शेतकऱ्यांना देखील खात्री आहे की त्यांच्या जवळ गेल्यावर आम्हाला काही मिळणार नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मंत्री गोरे यांनी लगावला.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील श्री सोमेश्वर व बनसिध्देश्वर मंदिर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे व त्यांच्या धर्मपत्नी सोनियाताई गोरे, आमदार सुभाष देशमुख यांनी दर्शन घेतले. त्यानंतर परिसरातील विविध विकास कामांचे उद्घाटन केले. प्रास्ताविक राजेंद्र कुलकर्णी यांनी केले.
या कार्यक्रमासाठी भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मोटे, पंचायत समितीचे माजी उपसभापती संदीप टेळे, औरादचे सरपंच शशिकांत बिराजदार, माजी सरपंच शांतकुमार गडदे, विंचूर चे सरपंच बाळासाहेब पाटील, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख अण्णाप्पा सतूबर,ज़िल्हाप्रमुख अमर पाटील, भाजपचे प्रशांत सलगरे, भाजपचे तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, भाजपचे राज्य कार्यकारणी सदस्य हनुमंत कुलकर्णी, हत्तूर येथील सोमेश्वर व बनसिद्धेश्वर ट्रस्ट अध्यक्ष सोमनिंग कनकपवडीयार, सूर्यकांत पाटील, बनसिद्ध पट्टेवडियर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अतुल गायकवाड, गुरुन्ना तेली, भीमाशंकर नरसोंडे, यांच्यासह विविध गावचे सरपंच व उपसरपंच यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.