Gold Silver Price Hike: दहा हजार रुपयांनी सोने, चांदी वाढली

अमेरिका इराण युद्धामुळे दरवाढीचा भडका
Gold Silver Price Hike
Gold Silver Price HikePudhari File Photo
Published on
Updated on

सोलापूर : सोने आणि चांदी दरवाढीचा रोजचा शिरस्ता थांबण्याचे नाव घेत नाही. रोज नवनवीन कारणांनी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमती वाढत आहेत. शनिवारी अमेरिका - इराण या दोन देशातील तणावामुळे सोने प्रति तोळा आणि चांदीचे प्रती किलो दर प्रत्येकी दहा हजारांनी वाढले.

शुक्रवारी सोलापूरच्या सराफ कट्ट्यामध्ये सोन्याचा प्रतितोळा जीएसटीसह दर एक लाख 58 हजार होता तो शनिवारी एक लाख 68 हजार 700 वर पोहोचला. चांदीचा दर शुक्रवारी प्रतिकिलो दोन लाख 90 हजार रूपये होता तो शनिवारी थेट तीन लाखांवर पोहोचला.

अमेरिका इराण युद्ध आणि जागतिक अशांततेची परिस्थिती यामुळे सोने, चांदीचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यातच शेअर बाजाराचीही पडझड कारणीभूत आहे.
- गिरीश देवरमनी, अध्यक्ष, सराफ असोसिएशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news