सोलापूर ः मंगळवारी सोने तीन हजार रूपयांनी कमी होऊन 88 हजार 800 रुपयांवर आले. चांदी सर्वाधिक नऊ हजारांनी कमी होऊन ती 91 हजार रुपये किलोवर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा दर दिवसागणिक वाढत होता. त्यामुळे सोने घेणे म्हणजे सामान्य नागरिकांना कठीण झाले होते. काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय बाजारातील पडझडीमुळे मंगळवारी सोन्याचा दर एकदम तीन हजार रूपयांनी खाली उतरला आहे. एरव्ही चढताना काही रुपयात चढत होता. उतरताना सुध्दा किरकोळ रूपयांनी कमी होत असे. पण, गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारातील घसरण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यामुळे गुंतवणूकदारांची निराशा झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेसह अन्य देशामध्ये सुरू असलेल्या गोंधळाच्या स्थितीमुळे बाजारात चढउतार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आजतगायत शेअर बाजार कोसळला की सोन्याचा दर वाढत असे. पण, सध्या शेअर बाजारही गतीने कोसळत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारावरून सोन्याचा दर ठरत असला तरी सध्या शेअर बाजारासह सोन्याचाही दर घसरत आहे. दर केव्हा वाढेल किंवा कमी होईल हे सांगणे अवघड आहे.
गिरीश देवरमनी, अध्यक्ष, सराफ असोशिएशन

