Cannabis cultivation: सोलापुरात घराच्या कंपाऊंडमध्येच गांजाची लागवड

एकाने थेट सोलापूर शहरातच राहत्या घराच्या कंपाऊंडसह समोरील जागेत गांजाची लागवड केल्याचे उघड झाले
Cannabis
Cannabis Pudhari
Published on
Updated on

सोलापूर : आजवर तुम्ही शेतात गांजाच्या झाडांची लागवड ऐकली असेल; मात्र एकाने थेट सोलापूर शहरातच राहत्या घराच्या कंपाऊंडसह समोरील जागेत गांजाची लागवड केल्याचे उघड झाले. याप्रकरणी सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 59 गांजाची झाडे जप्त केली असून, रजाक गफुर शेख (वय 49, रा. थोबडे वस्ती, जुना देगाव नाका, सोलापूर) याला जेरबंद केले. त्याच्याकडून चार लाख 39 हजार रुपयांचा 21 किलो 439 ग्रॅम गांजा जप्त करण्यात असून, चार एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

थोबडे वस्ती येथे रजाक शेख याच्याकडे संशयातून पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने घराच्या कंपाऊंडमध्ये गांजाची 59 झाडांची लागवड केल्याचे कबूल केले. त्याच्याजवळील गांजा, झाडांचे वजन केले असता, ते 21 किलो 430 ग्रॅम आढळून आले. रजाक शेख याच्या विरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news