Gangadharpant Kuchan: कुचन यांच्या निधनाने शोककळा

राज्यात 23 सहकारी सूत गिरण्या उभारणीत योगदान; सोलापुरात वसविले होते पहिले घरकुल
Gangadharpant Kuchan
Gangadharpant Kuchan
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूरसह महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी खा. गंगाधरपंत कुचन यांनी जवळपास राज्यातील 23 सहकारी सूत गिरण्यांच्या उभारणीमध्ये मोलाचे योगदान दिले. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून ते दोन वेळा खासदार झाले. सन 1980 मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा खासदार झाले. त्यानंतर 1984 च्या निवडणुकीत देखील ते विजयी झाले. अशा कर्तृत्त्वान नेत्याच्या निधनामुळे सोलापूरवर शोककळा पसरली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील यांचे ते तत्कालीन खंदे समर्थक मानले जात. 1989 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी डावलली. यानंतर मात्र 1990 मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून तत्कालीन भाजप उमेदवार लिंगराज वल्याळ यांच्या विजयासाठी कुचन यांनी मोठे योगदान दिले होते. यानंतर 1995 च्या सुमारास गंगाधर कुचन यांनी घरवापसी करत पुनश्च काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

सहकार व अन्य क्षेत्राचा मोठा अनुभव असल्यामुळे सोलापूर शहर जिल्ह्यासह राज्यातील विविध पक्षातील राजकारणी कुचन यांचे मार्गदर्शन घेत असत. सोलापुरातील सहकारी सूत गिरण्या, वस्त्रोद्योग विषयी संस्था, सहकारी बँका आदींच्या उभारणीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते. मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय तसेच अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या उभारणीतही त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

ते राज्य सहकारी बँकेवर औद्योगिक बँकेच्या माध्यमातून अनेक वर्ष संचालक होते. ते खासदार असताना विडी कामगारांसाठी घरकुल उभारणीची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. त्यांच्याच पुढाकारातून हैदराबाद रस्त्यावर विडी कामगारांचे पहिले घरकुल वसले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news