Solapur robbery: गलंदवाडीत दरोडा; वृद्ध दाम्पत्याचा अडीच लाखांचा ऐवज लुटला

चाकू, कोयत्याने मारहाण, सहा दरोडेखोरांचा दागिन्यांवर डल्ला
Solapur robbery |
गलंदवाडी (ता. मोहोळ) : येथील थिटे वस्तीवरील तानाजी थिटे यांच्या घरात दरोडखोरांनी विस्कटलेले साहित्य.Pudhari Photo
Published on
Updated on

पोखरापूर : मोहोळ तालुक्यातील गलंदवाडी गावच्या हद्दीत थिटे वस्तीवर सहा दरोडेखोरांनी वृद्ध पती-पत्नीला चाकू व कोयत्याने मारहाण करून त्यांचा जीव घेण्याची धमकी देत सोन्या- चांदीचे दागिने व दोन मोबाईल असा एकूण दोन लाख 61 हजार रुपयांचा ऐवज लुटला.

तानाजी थिटे व त्यांची पत्नी सिंधू हे वृद्ध दाम्पत्य थिटे वस्तीवर वास्तव्यास आहे. मंगळवारी (दि. 9) मध्यरात्री दोनच्या सुमारास सहा दरोडेखोरांनी थिटे पती-पत्नीस चाकू व कोयत्याने मारहाण केली. जीवे मारण्याची धमक देत, एक लाख 60 हजार रुपयांचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 24 हजार रुपये किमतीची तीन ग्रॅमची सोन्याची कानातील फुले, 40 हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, 24 हजार रुपयांचे सोन्याचे कानातील गुंड, चांदीचे पैंजण असे दागिने व दोन अँड्रॉईड मोबाईल असा एकूण दोन लाख 61 हजार रुपयांचा ऐवज लुटला. त्यानंतर दरोडेखोरांनी घराचा दरवाजा बाहेरून बंद करून तेथून पळ काढला. याप्रकरणी सिंधू थिटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात सहा दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट दिली.

कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला अन्

पहाटे दोन वाजण्याच्या दरम्यान घराबाहेर मोठमोठ्याने कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आल्याने थिटे पती-पत्नी घराबाहेर आले. दरवाजाजवळ हत्यारे घेऊन दबा धरून बसलेल्या दोघा दरोडेखोरांनी थिटे पती-पत्नीला घरात ढकलले. आणखी दोन दरोडेखोर घरात घुसले तर उर्वरित दोन दरोडेखोर घराजवळ निगराणी करत थांबले. धमक्या देत मारहाण करत घराची झडती घेऊन दरोडेखोरांनी दागिने लुटले. तानाजी थिटे यांच्या डोक्यावर सत्तूर मारुन त्यांना जखमी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news