Solapur Flat Fraud : पनाशमध्ये फ्लॅट देतो म्हणून दीड कोटीची फसवणूक

विजापूर रोडवरील पनाश अपार्टमेंटमध्ये फ्लॅटचा ताबा देतो म्हणून दोघांची दीड कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली
Fraud
FraudPudhari
Published on
Updated on

सोलापूर : विजापूर रोडवरील पनाश अपार्टमेंटमध्ये फ्लॅटचा ताबा देतो म्हणून दोघांची दीड कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. दोघेही नामवंत सी.ए. आहेत. याबाबत विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चार्टर्ड अकाउंटंट चेतन नंदकिशोर नोगजा (रा. वामन नगर, जुळे सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. चेतन नोगजा यांनी त्‍यांच्‍या व आईच्‍या नावाने २०२० मध्ये ए २ विंग मधील फ्‍लॅट नं १३०५ बुक केला होता. त्यासाठी त्यांनी मोनाली व अमित थेपडे यांची भेट घेतली. या फ्लॅटसाठी त्यांनी ३९ लाख ४६ हजार रुपये दिले. त्यानंतर बी विंग मधील फ्लॅट नं. १४०४ हा फ्लॅट त्‍यांच्‍या व पत्नीच्‍या नावे बुक केला. त्‍यासाठी ६५ लाख ६७ हजार रुपये दिले. पैसे स्विकारुनही आजपर्यंत त्‍यांनी फ्‍लॅटचा ताबा दिला नाही. त्यामुळे नोगजा यांनी विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली.

दुसरे चार्टर्ड अकाउंटंट सचिन अशोक कट्टे (रा. राघवेंद्र नगर, विजापूर रोड, सोलापूर) यांनीही पनाश अपार्टमेंटमधील बी-विंगमधील १२०३ क्रमांकाचा फ्लॅट घेण्यासाठी ५२ लाख १२ हजार रुपये दिले. परंतु त्‍यांनाही अद्याप फ्‍लॅटचा ताबा दिला नाही. दोघांच्‍या फिर्यादीवरुन मोनाली थेपडे, दीपक गुगले, शीतल देशमुख, अमित थेपडे, शंकर लोंढे व सागर शहा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news