

सोलापूर : सोलापूर-विजयपूर-रायचूर या गाडीने प्रवास करत असताना होटगी गाव परिसरात एका अज्ञान व्यक्तीने रेल्वेवर दगड मारला. या दगडामुळे रेल्वेतील आरोही अजित कारंगे (वय 4) या चिमुकलीचा मृृत्यू झाला.
दगड लागल्यानंतर तिला उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटल येथे दाखल केले होते. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला आहे. रेल्वे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. रेल्वेवर दगड मारणारे कोण होते, याचा शोध आता रेल्वे पोलिस घेणार आहेत. अशा प्रकारे मृत्यू झाल्यामुळे रेल्वे प्रवाशात घबराट पसरली आहे.