Solapur Crime: माचणूर येथे चार किलो गांजा पकडला

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार किलो 128 ग्रॅम गांजा घेऊन जाणाऱ्या संशयितास पकडले
Solapur Crime: माचणूर येथे चार किलो गांजा पकडला
Published on
Updated on

सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार किलो 128 ग्रॅम गांजा घेऊन जाणाऱ्या संशयितास पकडले. मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील उड्डाणपुलाजवळ ही कारवाई केली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी सचूना पथकास दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिस कॉन्स्टेबल राहुल देवकर हे तपास करत असताना त्यांना शाहूअली धावड (रा. ब्रम्हपुरी, ता. मंगळवेढा) हा तरुण शनिवारी (दि. 9) मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथे अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली.

त्यानुसार सापळा रचून शाहूअली धावड याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्या सॅकमध्ये चार किलो 128 ग्रॅम गांजा आढळून आला. त्याच्याकडून गांजासह मोटारसायकल, मोबाईल असा एकूण एक लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news