माजी न्यायाधीशाचे घर फोडले : सव्वा लाखांचे साहित्य चोरीस

शिवाजी नगर येथील घटना
माजी न्यायाधीशाचे घर फोडले : सव्वा लाखांचे साहित्य चोरीस
file photo
Published on
Updated on

बार्शी : येथील माजी न्यायाधीश यांच्या घरी भरदिवसा घरफोडी करून रोख रक्कम आणि लॅपटॉप व इतर साहित्य असा 1 लाख 24 हजार रुपये चोरून नेल्याची घटना शनिवारी सकाळी भर दिवसा शिवाजी नगर भागात घडली.

अ‍ॅड. नागराज शिंदे (वय 39, रा. गुलमोहर बंगला शिवाजी नगर अहिल्या देवी बागेजवळ बार्शी) यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचा वकिली व्यवसाय असून घराचे दुस-या मजल्यावरती ऑफिस आहे.आज सकाळी नेहमीप्रमाणे 10 वाजता वैयक्तिक कामासाठी घराच्या खालच्या खोलीत आले होते. त्यावेळी ऑफिसचा तसेच वरती जाण्यासाठी असलेल्या बाहेरील जिन्याचे गेट उघडेच होते. त्यानंतर काम आवरून वरती ऑफिसमध्ये गेले. तेव्हा कामासाठी टेबलवर ठेवलेला लॅपटॉप दिसुन आला नाही.दोन अनोळखी व्यक्तींनी लॅपटॉप व इतर साहित्य लंपास गेल्याचे दिसले. तसेच कपाटामधील 14 हजार रूपये मिळुन आले नाहीत. बार्शी शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news