Siddharam Mhetre | माजी गृहराज्यमंत्री म्हेत्रे शिवसेनेच्या वाटेवर

अक्कलकोटमध्येे 31 रोजी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश
Siddharam Mhetre |
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीप्रसंगी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शिंदे गटाच्या नेत्या अनिता माळगे, सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे.Pudhari Photo
Published on
Updated on

हंजगी : महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी बुधवारी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे नेतृत्व करणारे सिद्धाराम म्हेत्रे यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. दि 31 मे 2025 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत अक्कलकोट येथे पक्षप्रवेश होणार असल्याचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी सांगितले.

एकेकाळी काँग्रेसचे जिल्ह्याचे संपूर्ण सूत्र सिद्धाराम म्हेत्रे यांच्या हातात होते. पुढे 2009 पासून पक्षश्रेष्ठींनी माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने पक्ष बांधणीसाठी पक्षाकडून हवी तशी ताकद मिळताना दिसून येत नव्हती. यामुळेच काँग्रेसच्या गोठ्यात अस्वस्थता पसरत चालल्याचे माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी सांगितले.

पुढे बोलताना सिध्दाराम म्हेत्रे म्हणले की, मी कोणावर ही नाराज नाही. ज्या प्रकारे तालुक्यात भाजपच्या आमदाराला बळ मिळत आहे. त्या प्रकारे काँग्रेस श्रेष्ठीकडून मात्र कुठलेच सहकार्य होताना दिसून येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यकर्त्यांसाठी घेतला निर्णय : म्हेत्रे

गेल्या अनेक दिवसांपासून अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांना कामाच्या निमित्ताने होणार त्रास पाहता काही तरी निर्णय घेणे गरजेचे होते. म्हणून शिवसेनेत जाऊन कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी सांगितले. शिवसेनेत प्रवेश करून कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न करणार आहे. जर का शिवसेनेत प्रवेश करूनही कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसेल, तर मी पुन्हा एकदा संघर्षासाठी मैदानात उतरणार असल्याचे माजी आमदार म्हेत्रे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news