हजार लेकींच्या खात्यावर पाच हजार जमा

‘लेक लाडकी’ योजनेसाठी 5701 अर्ज ः तीन हजार 800 अर्जाची छाननी
Lek Ladki Yojana
‘लेक लाडकी’ योजनेसाठी 5701 अर्जPudhari Photo
Published on
Updated on

सोलापूर ः अमोल साळुंके

सरकारच्या वतीने मुलींचे सक्षमीकरण करण्यासाठी लेक लाडकी योजना सुरु केली. या योजनेसाठी जिल्ह्यातून पाच हजार 701 अर्ज आले आहेत. त्यातील तीन हजार 800 अर्जाची छाननी पूर्ण झाली आहे. एक हजार लेकींच्या खात्यावर पहिल्या हप्ताचे पाच हजार रुपये जमा केले आहेत.

Lek Ladki Yojana
‘Lake Ladki’ scheme : महाराष्ट्रासाठी ‘लेक लाडकी’ : मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्‍य सरकारचे पाऊल

प्रकल्पनिहाय अर्जाची आकडेवारी

अक्कलकोट - 236 अकलूज - 245 बार्शी - 199 करमाळा - 169

कोळा - 147 कुर्डूवाडी - 318 माळशिरस - 472 मंगळवेढा - 326

मोहोळ - 310 उत्तर सोलापूर - 194 पंढरपूर 1 - 336 पंढरपूर 2- 265

सांगोला - 126 सोलापूर सिटी - 1318 दक्षिण सोलापूर 546

टेंभूर्णी -239 वैराग - 255 असे एकूण 5701 अर्ज प्राप्त झाले आहेत.

महाराष्ट्र सरकारने गरीब कुटूंबांच्या मुलींना लखपती बनविण्यासाठी लेक लाडकी योजना सुरु केली आहे. या योजनेला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यासाठी आतापर्यंत 50 लाख रुपयांचा निधीचे वाटप केले आहे. अर्जाची संख्या मोठी असल्याने शासनाने पुन्हा एक कोटी रुपयांचा निधी महिला व बालकल्याण विभागास दिला आहे. अर्जाची छाननी सुुरु आहे. पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर पाच हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाने दिली आहे.

एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्यांचा समावेश

एक एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणार्‍या एक किंवा दोन मुलींना लेक लाडकी योजनेचा लाभ मिळणार आहे. एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे. दुसर्‍या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाने दिली.

असा मिळेल लाभ

पिवळ्या, केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात जन्म झालेल्या मुलींना पहिल्या हप्तापोटी पाच हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये, सहावीत गेल्यावर सात हजार रुपये, 11 वीत गेल्यावर आठ हजार रुपये, 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे.

Lek Ladki Yojana
Ratnagiri news : ‘लेक लाडकी’ करणार ‘लखपती’
लेक लाडकी योजनेसाठी जिल्ह्यातून पाच हजारांपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. त्या अर्जाची छाननी सुरु आहे. एक हजार लाडक्या लेकीच्या खात्यावर पहिल्या हप्ताचा निधी जमा करण्यात आला आहे.
-प्रसाद मिरकले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news