

सोलापूर : 11 वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी (दि.29) जाहीर झाली. सोलापूर, पुणे आणि अहिल्यानगर येथील एक लाख नऊ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले.
अकरावी प्रवेशासाठी पुणे विभागातील पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर येथे तीन लाख 96 हजार जागा आहेत. पुढील यादीत इतर विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होणार असल्याची माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
पुणे विभागात कला शाखेसाठी एक लाख सहा हजार 295 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी 18 हजार 884 विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित झाला आहे.