

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात सन 2025 च्या दीपावली सणानिमित्त शोभेच्या दारू (फटाके) विक्रीसाठी तात्पुरते परवाने देण्याचे नियोजन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
इच्छुक विक्रेत्यांनी विहित नमुन्यातील अर्ज, सेतू कार्यालय, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, सिद्धेश्वर पेठ, सोलापूर येथे प्राप्त करून 17 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत (सुट्टीचे दिवस वगळून) गृह शाखा, जिल्हादंडाधिकारी कार्यालय, सात रस्ता, शासकीय दूध डेअरी शेजारी सोलापूर येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे. अर्जासोबत फोटो, ना-हरकत प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, उतारा, स्थानिक प्राधिकरणाचे संमतीपत्र जोडावे लागणार आहे.