Jaykumar Gore: शहरातील आदीला नदीसह नाल्यांचे रेखांकन निश्चित करा

डीपीसी बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे निर्देश
Jaykumar Gore: शहरातील आदीला नदीसह नाल्यांचे रेखांकन निश्चित करा
Published on
Updated on

सोलापूर : आदीला नद्यांच्या पूर नियंत्रण रेषेच्या आतील बाजूस बांधकाम परवानगी दिलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे लागतील, आदिला नदी असो अथवा शहरातील नाला असो, त्याचे पुरनियंत्रणाचे इशारा देणारे रेखांकन निश्चित करा, त्यासठी जलसंपदा विभागाचे अभिप्राय घ्या, अशा सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिली.

जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी (दि. ११) नियोजन भवनातील सभागृहात पालकमंत्री गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यांत अतिवृष्टी झाल्यानंतर सोलापूर शहरातील आदिला नदीला पूर येऊन अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. आदीला नदीच्या पात्रात अतिक्रमण करून बांधकाम झाल्याचा आरोप झाले.

या बैठकीत आ. सुभाष देशमुख यांनी आदीला नदी परिसरात बांधकाम झाले आहेत. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून रेखांकन निश्चित केली जाणार आहेत. शिवाय ७४ नाल्यांचा प्रश्न गंभीर बनले आहेत. तसेच या परिसरात काही ठिकाणी लेआऊट मंजूर झाले आहेत. ते प्रकरण आता बांधकाम परवानगीसाठी महापालिकेत येतील, या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याचा मुद्दा उपस्थित केला.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आदिला नदी परिसरातील अतिक्रमण काढायचे ठरल्यास ज्यांनी बांधकाम परवानगी दिली. त्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे लागतील. आदिला नदीचे खोलीकरण करून पाण्यासाठी वाट मोकळी करून द्यावी, गेल्या ५० वर्षांत या नदीला महापूर आले नव्हते. त्यामुळे कारवाई करताना खोलीकरणाबरोबरच नदीच्या पात्राचे रेखांकन निश्चित होतील, अशा सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news