

माळशिरस : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी निवेदन दिले. राज्यात प्रीपेड मीटर बसविण्यासाठी सक्ती करणार्या कंपनीवर आणि अधिकार्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र सरकारने प्रीपेड मीटर बसविण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे ग्राहकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत. ग्राहकांमध्ये प्रीपेड मीटर बसविण्या संदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे असंतोष पसरला आहे. या प्रश्नावर मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री या नात्याने फडणीस यांनी स्वतः जुलै महिन्यात पार पडलेल्या अधिवेशनात प्रीपेड मीटर बसविण्या संदर्भात कुणावरही सक्ती केली जाणार नाही, तो निर्णय रद्द केला असल्याची माहिती दिली आहे.
मात्र, सक्तीने प्रीपेड मीटर बसविण्याचे तात्काळ थांबविण्याचे आदेशही देण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.