Farmers loan waiver: ...तर शेतकरी पुन्हा कर्ज खाईत

अतिवृष्टी, पूर बाधित शेतकरी राहणार कर्जमाफीपासून वंचित
Farmers loan waiver
Farmers loan waiverPudhari
Published on
Updated on

सोलापूर : राज्य शासनाने शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीदार असलेल्या पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली असून, यात सन 2025 ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधितग्रस्त झालेले पुढील सहा महिन्यांत म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत थकबाकीदार होणारे शेतकरी मात्र या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहणार आहेत.

शासनाच्या सप्टेंबर 2025 च्या या अटींमुळे अनेक शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत जाणार आहेत. शासनाने कर्जमाफीसंदर्भात विधानसभा निवडणुकीत घोषणा केली होती. परंतु त्याची अंमलबजावणी केली नव्हती.

दरवर्षी शेतकरी मे ते जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यांत खरीप हंगामातील पिकांसाठी पीक कर्ज घेतात, तर ऑगस्ट, ते सप्टेंबर या महिन्यात रब्बी पिकांसाठी पीक कर्ज घेतात. तर द्राक्ष, डाळींब, केळी, ऊस यासारख्या बहुवार्षिक आणि वार्षिक पिकांसाठी एप्रिल ते ऑक्टोबरपर्यंत पिकाची लागवड करुन कर्ज घेतात. बहुतांश शेतकऱ्यांनी या कालावधीतच पिके घेतली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news