Shiv Jayanti in Paris: पॅरिसमध्ये शेतकऱ्यांनी केली शिवजयंती साजरी
गुळवंची : पॅरीस येथे अभ्यास दौऱ्यासाठी गेलेल्या सोलापूर जिल्ह्यतील शेतकऱ्यांनी शिवजयंती उत्साहात साजरी केली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमला.
राज्यातील शेती अधिक आधुनिक, स्पर्धात्मक व शाश्वत करण्याच्या उद्देशाने कृषी विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या वतीने सन 2025-26 अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत युरोप देशांचा अभ्यास दौऱ्यास दि.15 रोजी प्रारंभ झाला असून राज्यातील विविध जिल्ह्यांतील एकूण 52 प्रगतिशील शेतकरी व दोन कृषी अधिकारी या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले आहेत.
दि.19 रोजी सकाळी शिवजयंतीचे औचित्य साधून पॅरिस मधील महलात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन श्रीक्षेत्र मार्डीचे भूमिपुत्र तथा भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथ कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसह तिरंग्याचे पूजन
याप्रसंगी युरोप अभ्यास दौऱ्यात असलेल्या 52 शेतकऱ्यांच्या व दोन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन प्रतिमेचे तसेच तिरंगा व भगव्या ध्वजाचे पूजन मान्यवर अधिकारी व शेतकरी बंधू भगिनींच्या उपस्थितीत करण्यात आले.

