

सोलापूर : उत्तर आणि दक्षिण सोलापूर या दोन तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील श्री सिद्धेश्वर, लोकमंगल (बिबीदारफळ, भंडारकवठे), जयहिंद, सिद्धनाथ, आणि गोकुळ असे सहा साखर कारखाने आहेत. यापैकी एकाही साखर कारखान्याकडून ऊसाचे दर अद्यापपर्यंत जाहीर करण्यात आला नाही.
यंदाच्या गाळप हंगामाला पंधरवडा उलटून गेला आहे. तरीपण एकाही साखर कारखान्याकडून दर जाहीर केला नाही. यंदाच्या गाळप हंगामातील ऊसाला कारखानदाराकडून किती दर जाहीर होईल याकडे ऊस उत्पादक शेतकर्यांचे लक्ष लागून राहिला आहे. दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्याच्या कार्यक्षेत्रात सहा साखर कारखाने आहेत. चालू वर्षाचा गाळप हंगाम सुरू झालेला आहे. यातील कारखान्याने साखर पोतीचे पूजाही केला आहे. यात सिद्धेश्वर हा एकमेव कारखाना सहकारी आहे. बाकी अन्य कारखाने खासगी आहेत. मात्र लोकमंगल शुगर, इथेनॉल आणि को-जन भंडारकवठे, श्री. सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना कुमठे, सिद्धनाथ तिर्हे, जयहिंद आचेगाव आणि गोकुळ धोत्री आदी साखर कारखाने सध्या चालू झालेली आहेत. जिल्ह्यातील आमदार अभिजित पाटील आणि माजी आमदार बबनराव शिंदे यांनी मात्र सर्वाद आधी 3500 चा दर जाहीर करूनच यंदाचा गाळप हंगाम चालू केलेली आहेत.
मात्र दक्षिण, उत्तर सोलापूर या दोन तालुक्यात असलेल्या एकाही साखर कारखान्याकडून यंदाचा दर जाहीर करण्यात आला नाही. गाळप मात्र सुरू आहे. यापूर्वी गाळप हंगामाचे बॉयलर पेटवण्याची तयारी कारखान्याकडून सुरू होताच दर जाहीर करण्याची मागणी शेतकर्यासह शेतकरी संघटनेकडून सुरू होत असे. याशिवाय दराच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी किंवा साखर आयुक्त यांना निवेदनही दिले जात असे. आणि शेतकरी संघटना आक्रमकतेची भूमिका घेत. यावर्षी मात्र तसे काहीही झालेला नाही. या दोन्ही तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकर्यासह बटईने आणि टनेजवर ठरवून दुसर्याची शेती कसणार्या शेतकर्यांचेही दराची चिंता लागली आहे.
कारण लागवडीसह महागलेली रासायनिक खते आणि वाढत्या मजुरीमुळे ऊस उत्पादकांना दर वाढण्याची अपेक्षा आहे. दर जाहीर करण्याच्या निर्णयाकडे शेतकर्यांचे लक्ष लागलेला आहे. पंढरपूर आणि माढा येथील साखर कारखान्यांना 3500 हजार रुपयांचा दर देणे परवडत असेल तर येथील कारखान्यांना परवडत नाही. का? असा सवाल शेतकर्यांमधून व्यक्त केली जात आहे. एफआरपीचा आकडा जरी मोठा वाटत असला तरी प्रत्यक्षात शेतकर्यांच्या हातात किती पडतात. असा सवालही त्यांच्यातून व्यक्त होत आहे.