Solapur murder case: कामतीमध्ये डोळ्यात चटणी टाकून शेतकऱ्याचा खून

तलवारीने वार : भावजयीसह दोन पुतण्यांवर गुन्हा
Murder Case
Murder CasePudhari
Published on
Updated on

कामती : मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द येथील लमाण तांडा परिसरात सहा एकर शेतीच्या वादातून शेतकऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून तलवारीने वार करत खून केल्याची घटना सोमवारी (दि. २२) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. याप्रकरणी मृताची भावजय व दोघा पुतण्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

संजीवकुमार नागनाथ शिंदे (वय ५२) असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याची पत्नी सुनीता संजीवकुमार शिंदे यांच्या फिर्यादीवरून भावजय सुरेखा सतीश शिंदे, दोन्ही पुतणे रणजित सतीश शिंदे व रितेश सतीश शिंदे यांच्याविरुद्ध कामती पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला.

अशी घडली घटना...

संजीवकुमार शिंदे हे सकाळी दूध व पाणी आणण्यासाठी गावात गेले होते. तेव्हा वाटेतच डाळिंब बागेत त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यावेळी सुरेखा सतीश शिंदे हिने संजीवकुमार यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली, तर पुतणे अनुक्रमे रणजित शिंदे व रितेश शिंदे यांनी तलवारीने त्यांच्या हात, गळा व डोक्यावर वार केले. हल्ल्यानंतर आरोपींनी सुनीता शिंदे यांनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news