बार्शी : वन्य प्राण्याच्या त्रासापासून पिकाचा बचाव व्हावा, यासाठी शेजारच्या शेतकर्याने शेताच्या कडेला सोडलेल्या विद्युत प्रवाह असलेल्या तारेचा स्पर्श होऊन एका शेतकर्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार तालुक्यातील धामणगाव शिवारात घडला.
रघुनाथ निवृत्ती ढोणे (वय 65 रा. धामनगाव) असे विजेचा धक्का लागल्याने मयत झालेल्या शेतकर्याचे नाव आहे. बाबाराव निवृत्ती ढोणे असे शेतकर्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शेतकर्याचे नाव आहे. मृत शेतकर्याची पत्नी शोभा रघुनाथ ढोणे (वय 59) यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यांची शेती धामनगाव येथे आहे. शेतातील ज्वारीचे पीक काढणीस आल्यामुळे ते काढणे करीता पती रघुनाथ हे गावी धामनगाव येथेच राहीले. फिर्यादी मुलीकडे पुणे येथे गेल्या होत्या. धामनगावचे पोलीस पाटलांनी त्यांना फोनवर सांगितले की, तुमचे पती रघुनाथ हे बाबाराव निवृत्ती ढोणे यांनी त्यांचे शेतात डुकर येवु नये म्हणुन तारेस विद्युत करंट दिला होता. त्या तारेचा विद्युत शॉक पती रघुनाथ यांना लागुन ते जगीच मयत झाले आहेत. धामनगाव येथे गेल्यावर लोकांकडून समजले की बाबाराव ढोणे याने लाकडी दांडक्याला तार लावुन त्यात विद्यत प्रवाह सोडला होता. त्या तारेचा शॉक पती रघुनाथ मयत झाले. तपास पोलीस करत आहेत.

