Solapur news: सीईओ जैन यांच्या नावाने फेक व्हाट्सअप प्रोफाईल

व्हिएतनाम येथील नंबर : चुकीचा नंबर ब्लॉक करण्याचे आवाहन
Solapur news: सीईओ जैन यांच्या नावाने फेक व्हाट्सअप प्रोफाईल
File Photo
Published on
Updated on

सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या नावाने फेक व्हाट्सॲप प्रोफाईल तयार करुन अनेकांना मेसेज पाठविण्यात येत आहे. तो नंबर व्हिएतनाम येथील आहे. त्यामुळे तो ब्लॉक करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे सीईओ जैन यांनी केले.

चुकीचा व्हॉट्सॲप प्रोफाईल तयार करुन मेसेज पाठविण्यात असल्याची माहिती सीईओ जैन मिळाताच त्यांनी तातडीने सायबर क्राईमकडे तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्या नंबरची चौकशी केली असता व्हिएतनाम येथील नंबर असल्याचे दाखविण्यात येत आहे.

दरम्यान, 84567766970 या बोसग नंबरच्या सहाय्याने सीईओ जैन यांचा व्हाट्सॲप तयार करुन सीईओ जैन यांचा प्रोफाईलला फोटो ठेवण्यात आला आहे. तसेच त्या व्हाट्सॲपद्वारे अनेकांना मेसेज केला जात आहे. तो फेक नंबर असून, त्याला कोणीही उत्तर देवू नये. तसेच त्यानंबर वरून मेसेज आल्यास नंबर ब्लॉक करण्याचे आवाहन सीईओ जैन यांनी जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news