

सोलापूर : आ. विजयकुमार देशमुख यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने सोलापूर शहरा लगतच दहिटणे येथे राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत घरकुले उभे केली असून, या घरकुलांचे हस्तातंरण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते येत्या रविवारी, दि. 17 ऑगस्ट रोजी होणार आहे.
यावेळी राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर, पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. हा कार्यक्रम रविवार दि. 17 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण प्रकल्प व श्री सो.स. क्षत्रिय समाज महालक्ष्मी गृहनिर्माण संस्था यांचे संयुक्तीकरित्या हस्तांतरण कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण प्रकल्पगट नं. 92/2, बक्षी हिप्परगा रोड, दाळमील समोर, दहिटणे, सोलापूर येथे होणार आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहावेत, असे आवाहन राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सह. संस्था, मर्या. दहिटणेचे मुख्य प्रवर्तक आ. विजयकुमार देशमुख, राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सह. संस्थेचे सुरेश रेवाप्पा बिराजदार, सचिव आण्णाराव महादेव कानडे यांनी केले आहे.
पहिल्या टप्यात 1200 घरांचे हस्तांतरण
प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत सोलापूर शहरातील गोर गरीब जनतेला स्वतःच हक्काच घर मिळावं या करिता आ. विजयकुमार देशमुख यांनी स्वप्न पाहिलेलं आज ते सत्यात उतरत आहे, दहिटणे भागात 5 हजार घरांची निर्मिती आ.विजयकुमार देशमुख हे करत आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यातील1200 घरांचे हस्तांतरण दि. 17 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.