Solapur News: तब्बल 17 दिवसांनी अखेर विस्ताराधिकारी निलंबित

अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिका : जिल्हा परिषदेचे सीईओ जंगम यांची कारवाई
Solapur News: तब्बल 17 दिवसांनी अखेर विस्ताराधिकारी निलंबित
Published on
Updated on

सोलापूर : दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदिप खरबस यांनी मंजूर कामाचे बिल काढण्यासाठी दोन हजार रूपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (30 ऑक्टोबर) कारवाई केली होती. त्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी निलंबनाचे आदेश दिले होते. मात्र, खरबस यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली नव्हती. त्यामुळे तब्बल 17 दिवसानंतर जंगम यांनी विस्तार अधिकारी खरबस यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी खरबस यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते. तसेच या काळात पंढरपूर पंचायत समिती कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, खरबस हे दक्षिण पंचायत समिती येथेच काम करत असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे सीईओ जंगम यांनी विस्तार अधिकाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई केली.

दरम्यान, खरबस यांनी दक्षिणमध्ये विस्तार अधिकारी पदभार घेतल्यापासून अनेक ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली होती. मात्र या तक्रारीकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्यामुळे मंजूर कामाचे बिल काढण्यासाठी दोन हजार रूपये लाच घेताना खरबस यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 30 ऑक्टोबर रोजी लाचखोरीची कारवाई झाल्यानंतरही खरबस यांना निलंबित करण्यात आले नव्हते. त्यामुळे या काळात निलंबन का करण्यात आले नाही, याची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news