Competitive Exams Fee : शेजारच्या राज्यांत परीक्षा शुल्क माफ; महाराष्ट्रात मात्र सवलतीवर बोळवण

गुजरात, तामिळनाडू, आसाममध्ये अनुसूचित जातीच्या उमेदवारांना परीक्षा शुल्क माफ
Exam
ExamPudhari
Published on: 
Updated on: 
आमसिद्ध व्हनकोरे

सोलापूर : शेजारच्या राज्यातील अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील स्पर्धा परीक्षार्थींना परिक्षा शुल्कात १०० टक्के सूट दिली जाते. महाराष्ट्रात मात्र पूर्ण शुल्क माफीऐवजी फक्त सवलतीवर बोळवण केली आहे. त्यामुळे राज्यातील या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर आर्थिक भार पडत आहे.

गुजरातमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी तेथील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना अर्ज व परीक्षा शुल्कातून पूर्ण सूट आहे. तामिळनाडूमध्ये अनु. जाती- जमातीच्या उमेदवारांना परीक्षा शुल्क माफ असून, येथे फक्त एकदाच नोंदणी शुल्क भरावे लागते. आसाममध्येही सरकारी भरतीच्या परीक्षांसाठी SC आणि ST उमेदवारांना शुल्कमाफी दिली आहे. केंद्र सरकारच्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्येही अनुसूचित जातीच्या उमेदवारांना परीक्षा शुल्कातून सूट आहे.

महाराष्ट्रातील राज्यसेवा परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गाला ५२४ ते ५४४ रुपये, तर अनुसूचित जातीच्या उमेदवारांना ३२४ ते ३४४ रुपये शुल्क भरावे लागते. गट-क परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गाचे शुल्क ३९४ रुपये, तर SC साठी २९४ रुपये आहे. सरळसेवा भरतीतही परिक्षेच्या शुल्कातील फरक मर्यादित आहे.

‘बार्टी’मार्फत शुल्क भरण्याची मागणी

बार्टी मार्फत मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण व विद्यावेतनाची सुविधा असली, तरी प्रत्यक्ष परीक्षा अर्ज शुल्कातून पूर्ण माफी नाही. त्यामुळे अन्य राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी शंभर टक्के परीक्षा शुल्कमाफी लागू करावी किंवा बार्टीकडून ती भरण्यात यावी, अशी परीक्षार्थींची मागणी आहे.

अन्य राज्यांतील स्थिती

गुजरात : GPSC परीक्षांसाठी पात्र SC उमेदवारांना शुल्कमाफी

तामिळनाडू : TNPSC परीक्षांमध्ये SC-ST उमेदवारांना परीक्षा शुल्क माफ

आसाम : सरकारी भरती परीक्षांमध्ये SC-ST उमेदवारांना शुल्कमाफी

केंद्र सरकार : UPSC आणि SSC परीक्षांमध्ये SC उमेदवारांना परीक्षा शुल्कातून सूट

महाराष्ट्रातील शुल्काची स्थिती

राज्यसेवा परीक्षा : खुला ५२४ ते ५४४ रुपये; अनुसूचित जाती ३२४ ते ३४४ रुपये

गट-क परीक्षा : खुला ३९४ रुपये; अनुसूचित जाती २९४ रुपये

सरळसेवा भरती : काही भरतींमध्ये खुला प्रवर्ग सुमारे १,००० रुपये; तर अनुसूचित जातीसाठी ९०० रुपये

बार्टी सुविधा : मोफत प्रशिक्षण व विद्यावेतन उपलब्ध

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.