Markadwadi EVM voting: ईव्हीएम नको म्हणणाऱ्या मारकडवाडीने ईव्हीएमवरच केले 70 टक्के मतदान

ईव्हीएम विरोधातील मारकडवाडी पॅटर्न देशभर चर्चेत आला होता
Markadwadi EVM voting
Markadwadi EVM votingPudhari
Published on
Updated on

माळशिरस : ईव्हीएम विरोधातील मारकडवाडी पॅटर्न देशभर चर्चेत आला होता. गावकऱ्यांनी ईव्हीएमवर मतदान नको म्हणत चिठ्ठीवर मतदानाचा प्रयत्न केला होता. तो प्रशासनाने हाणून पाडला. यानंतर अनेक बड्या नेत्यांनी मारकडवाडीत धाव देत टीकाटिप्पणी ची झोड उठवली होती. आमदार उत्तम जानकर यांनी हा मुद्दा उचलून धरून देशभर आक्रमक टीकाटिप्पणी केली. याच गावात सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी गावकऱ्यांनी पुन्हा ईव्हीएमवर 70.28 टक्के मतदानाचा हक्क बजावला आहे.

मारकडवाडी गाव जिल्हा परिषदेला फोंडशिरस गटात तर पंचायत समितीला भांबुर्डी गणात येत आहे. प्रामुख्याने भाजपच्या माजी आमदार राम सातपुते व विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांच्यातील या मुद्द्यावरून मोठी टीकाटिप्पणी समोर आली होती.

यावेळी दोघांनीही आपल्या भूमिका मांडताना हे गाव आपल्या पाठीशी असल्याचा दावा केला होता. या निवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी अर्जुनसिंह मोहिते-पाटील तर पंचायत समितीसाठी ॲड. प्रवीण वाघमोडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आहेत. विरोधी भाजपाकडून गटातून हरीदास वाघमोडे व गणातून देविदास वाघमोडे या प्रमुख उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. निकालानंतर कोणाच्या पदरी पडणार, याकडे सर्वांचे विशेष लक्ष लागून राहणार आहे.

मारकडवाडी एकूण मतदान - 2499

बूथ नं. - 90 - एकूण मतदान 1075 - पैकी 793 पोल

बूथ नं. -91 - एकूण मतदान - 1015- पैकी 692

बूथ नं. - 92 - एकूण मतदान - 409 पैकी 286

एकूण झालेले मतदान - 1771, तर टक्केवारी - 70.28 टक्के झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news