

सोलापूर : पोलिस असल्याची बतावणी करीत वृद्धाचे 75 हजार रुपयांचे 15 ग्रॅमचे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना 22 ऑगस्ट रोजी सकाळी कुमठा नाका परिसरात घडली. अशोक भुजबळ सुमंत (वय 78, रा. बालाजी सोसायटी, कुमठा नाका, सोलापूर) हे सकाळी वॉकिंगसाठी बाहेर पडले होते.
यावेळी दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने मी पोलिस असल्याचे सांगत आम्हाला कुणालाही तपासण्याचा अधिकार आहे वरून तसे आदेश असल्याचे सांगत सोबतच्या इसमाची झडती घेतली. त्याच्या खिशातील सर्व साहित्य हातातील अंगठी काढून ती रुमालात बांधून त्याच्या हाती दिली. लागलीच अशोक सुमंत यांनाही तशाच पद्धतीने गळ्यातील चेन आणि सोन्याची अंगठी काढायला लावून हातचलाखीने पळविली. याबाबत सुमंत यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.