Solapur news: वृद्ध दाम्पत्याचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू

कुमठा नाका परिसरातील घटना; पत्नीचा खाटेवर तर पतीचा मृतदेह जमिनीवर
Solapur news: वृद्ध दाम्पत्याचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू
Published on
Updated on

सोलापूर : कुमठा नाका परिसरातील स्वागत नगर येथे रविवारी (15 मार्च) दुपारी पावणेबाराच्या सुमारास वृद्ध दाम्पत्याचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळला. महादेव मंचाळ (वय 68) आणि रंगम्मा मंचाळ (वय 63) असे त्या पती-पत्नीचे नाव आहे. ज्या वयात आधाराची आणि मायेची नितांत गरज असते, त्याच वयात एका वृद्ध दाम्पत्याचा असा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या या हृदयद्रावक घटनेने परिसरात सुन्न शांतता पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घराचा दरवाजा आतून लॉक नसल्याचे पोलिसांनी सांगितलेे. घरात पत्नीचा मृतदेह खाटेवर, तर पतीचा मृतदेह खाली चटईवर आढळला. आयुष्यभर एकमेकांची साथ देणाऱ्या या जिवाभावाच्या जोडीचा असा शेवट व्हावा, हे पाहून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय सिव्हिल रुग्णालयात पाठवले आहेत.

दरम्यान, या घटनेबाबत परिसरात विविध चर्चांना उधाण आल असून कुटुंबात मालमत्तेवरून जुने वाद सुरू असल्याची माहिती काही नागरिकांनी दिली. तर अज्ञात व्यक्तीने त्यांचा घातपात केला असावा, असा संशयही व्यक्त केला जात आहे. हा मृत्यू नैसर्गिक आहे, आत्महत्या आहे की घातपात, याचे गूढ अद्याप कायम आहे. पोस्टमॉर्टम अहवाल आणि तपासातूनच या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news