Solapur temperature: सोलापुरात यंदा उच्चांकी 41.4 अंश तापमानाची नोंद

पुढील आठवडाभर तापमान वाढण्याचा इशारा
Temperature Rise
Temperature RisePudhari
Published on
Updated on

सोलापूर : यंदा सोलापूरकरांसाठी उन्हाळा तापदायक ठरत असून, 11 एप्रिल रोजी 41.4 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. यंदाच्या मोसमातील हे सर्वाधिक तापमान ठरले. दरम्यान, हवामान तज्ज्ञांच्या मते पुढील येत्या 4-5 दिवसांत सोलापूरचा उन्हाचा पारा 42 से. ते 43 से. पर्यंत जाण्याची चिन्हे आहेत.

यंदाच्या उन्हाळ्यात पाच वेळा कमाल तापमानाचा पारा 40 अंश पार केला. हवेतील आर्द्रता 31 टक्के असल्याने कोरड्या हवेमुळे उन्हाचे चटके अधिक तीव्र स्वरूपात जाणवले. दुपारी 12 ते सायंकाळी 5 या काळात शहरात अक्षरशः ओव्हन सारखी स्थिती जाणवली. तज्ज्ञांच्या मते पुढील 48 ते 72 तासांत विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट परिणाम सोलापूरच्या तापमानावर होण्याचा अंदाज आहे.

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने चक्कर येणे किंवा शुद्ध हरपण्याचे प्रकार घडू शकतात. त्यासाठी तहान नसली तरी दर अर्ध्या तासाला पाणी प्या. घरी बनवलेली लस्सी, लिंबू पाणी आणि ताकाचा वापर वाढवा. शक्यतो उन्हात फिरणे टाळावे.
- डॉ. सीमा क्षीरसागार, एम.डी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news