

हंजगी : जात, धर्म व पंथ न पाहता फक्त तळागाळातील लोकांच्या कामाला प्राधान्य देणारे सिध्दराम म्हेत्रे आणि शंकर म्हेत्रे ही राम-लक्ष्मणाची जोडी आहे. या राम-लक्ष्मण जोडींनी एकत्रित येत येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भगवा फडकवण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे तसेच शिवसेनेचे मंत्रीगणांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी अक्कलकोट येथे राष्ट्रीय काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, शंकर म्हेत्रे व कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी महासभेला संबोधित करताना एकनाथ शिंदे हे बोलत होते.
यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री संजय राठोड, शिक्षण मंत्री दादाराव भुसे, आमदार राजू खरे, माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.
सभेला संबोधित करण्यापूर्वी कार्यक्रमास भरपूर उशीर झाल्याने व्यासपीठावर नतमस्तक होऊन कार्यकर्त्यांची दिलगिरी व्यक्त करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सिध्दाराम म्हेत्रे यांच्या नावातच राम आहे. ते इतके दिवस काँग्रेसमध्ये का थांबले हेच मला कळाले नाही. सिध्दाराम भिऊ नका तुमच्या पाठीशी स्वामी समर्थांचा आशिर्वाद आहे. दुधनी व मैंदर्गी नगरपरिषदेचे भविष्य नक्कीच बदलेल. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भगवा फडकवा. गाव तिथे शाखा व गाव तिथे भगवा फडकवण्याचे आवाहन यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले.
यावेळी सिध्दाराम म्हेत्रे म्हणाले की, आजपर्यंतच्या माझ्या आयुष्यात एकनाथ शिंदे सारखा नेता मी पाहिला नाही. तालुक्यात काम करण्यासाठी सध्या निधीची गरज आहे. तालुक्यात कुरनूर धरणाच्या पर्यटन स्थळासाठी, एआयडीसीच्या निर्मितीसाठी, बोरामणी विमानतळ, एकरुख सिंचन योजना, देगाव एक्स्प्रेस कॅनाल आदी योजना पूर्ववत होण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे त्यांनी निधीची मागणी केली.
यावेळी नीलमताई गोरे, माजी आमदार शहाजी बापू पाटील, मंगेश चिवटे, अमोलबापू शिंदे, शिवसेना नेत्या ज्योती वाघमारे, जिल्हा प्रमुख अमर पाटील, रमेश बारसकर,प्रा शिवाजीराव सावंत, जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे, महिला संपर्कप्रमुख अनिताताई माळगे, मनिष काळजे, जिल्हा प्रमुख अमर पाटील, दिग्विजयसिंह बागल, संजय कोकाटे, शंकर म्हेत्रे, बाळासाहेब पाटील, वर्षा हावनुर आदींनी महासभेला संबोधित केले. यावेळी संपर्क प्रमूख महेश साठे, सचिन चव्हाण, प्रियंका परांडे, सुरेखा काटगाव, तालुकाप्रमुख संजय देशमुख, रविना राठोड उपस्थित होते.